headerphoto
भाषा बदला: मराठी| English
headerphoto headerphoto

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
विद्या परिषद

७०८,सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०



प्रास्ताविक :

     

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे हे शालेय शिक्षण विभागाची विद्याशाखा म्हणून ओळखली जाते.
     राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी शासन निर्णय शिक्षा व समाजकल्याण विभाग ठराव क्र. पी. टी. सी .१०६३ - ए दि. २९/१०/१९६३ अन्वये सन १९६४ मध्ये 'राज्य शिक्षणशास्त्र संस्था ' या नावाने या संस्थेची मूळ स्थापना झाली.
     राज्य पातळीवरील सर्व संस्थांच्या शैक्षणिक विकासाच्या कार्यात समन्वय आणि सुसूत्रता यावी यासाठी राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे उच्चीकरण व सबलीकरण करून शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. पी. टी. सी. १०८४/६८९५/८२५/८४ - ४ दि ३१/ ८/१९८४ अन्वये सन १९८४ मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेची निर्मिती झाली.शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण ,संशोधन व मूल्यमापन इत्यादी क्षेत्रामधील विविध जबाबदाऱ्या हे संस्था पार पाडते.
     पाटी पेन्सील देऊन बालकांचा मोफत व शिक्षणाचा कायदा २००९ अन्वये कायदयाच्या ३६ ची पोरकलमे (१) आणि (२) अनुसार शासनाच्या दि ७ मार्च २०१२ अनुसरे विद्याविषयक म्हणून घोषित केली आहे.

भूमिका आणि कार्ये :

१) प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकास आणि शिक्षक प्रशिक्षण यांसाठी
    राज्यपातळीवरील शिखर संस्था म्हणून कार्ये करणे.
२) शासनास शैक्षणिक बाबींसंबंधी सल्ला व सहकार्य देणे.
३) शैक्षणिक संशोधन प्रकल्प हाती घेणे. शालेय स्तरावरील शैक्षणिक
    संशोधनास चालना देऊन संशोधनाचे निष्कर्ष गुणवत्ता वाढीसाठी
    वापरण्याबाबत प्रेरणा व प्रोत्साहन देणे.
४) प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमाचा (इ. १ ली ते इ. ८ वी ) आढावा
    घेऊन पुनर्रचना करणे.
५) सेवापूर्व आणि सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षण तसेच अन्य प्रशिक्षण
     कार्यक्रमांच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन पुनर्रचना करणे.
६) शिक्षक आणि शिक्षक -प्रशिक्षकांसाठी अध्ययन-अध्यापनविषयक
    साहित्य विकसित करणे.
७) लोकसंख्या शिक्षण, मुलींचे शिक्षण, मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण
     यासंबंधी उदबोधन वर्गांचे आयोजन करून जाणीव-जागृती करणे.
८) एनसीईआरटी, नीपा, एनसीटीई, आरआयई या राष्ट्रीय स्तरावरील
    संस्था आणि बालभारती, बालचित्रवाणी , मीपा, एस. एस. सी. बोर्ड
    या राज्यस्तरावरील संस्थांशी समन्वय साधून कार्य करणे.
९) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या शैक्षणिक कार्यावर संनियंत्रण
    ठेवून त्यांच्या प्रगतीच्या आढावा घेणे .
१०) प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक-प्रशिक्षकांमधील व्यावसायिक क्षमता
     वृद्धिंगत करण्यासाठी 'जीवन शिक्षण' मासिक व अन्य शैक्षणिक
     साहित्य प्रकाशित करणे.


नागरिकांची सनद पाहण्यासाठी इथे क्लिक करा...


firefox
श्री. एन.के. जरग
संचालक,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

News

आमच्या इतर राज्यस्थरीय शैक्षणिक संस्था

1) एम.पी.एस.पी., मुंबई
2) एस.एस.सी बोर्ड
3) परीक्षा परिषद
4) बालभारती
5) महाराष्ट्र शासन

संकेत स्थळाला भेट
देणार्यांची संख्या

Visitors Count


Valid :
Valid HTML 4.01 Transitional

Valid CSS!

NIC
National Portal
of India
MumbaiPolice
Mumbai Police
AntiCorruptionBureau
Anti Corruption

MaharashtraPolice
Maharashtra
State Police

MumbaiTrafficPolice
Mumbai
Traffic Police

MaharashtraTourism
Maharashtra
Tourism

Lokrajya
Maharashtra
Lok Rajya
News

DepSalesTax
Maharashtra
Maha VAT

ST
Maharashtra
State Transport